पिंपरी (Pclive7.com):- महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या तेजस्विनी बसखाली चिरडून एका दुचाकीस्वार तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि.१७) सकाळी पावणेदहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनजवळील रस्त्यावर घडली.
लक्ष्मी सुनिल जंगम (वय २४, रा. दत्त मंदिराजवळ, डी ब्लॉक, बालाजी चौक, मोहननगर, चिंचवड) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनिल सखाराम बोकड यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बस (क्र. एमएच/१२/क्युडब्लु/८९०९) वरील चालक गणेश तुकाराम सोंडगे (वय ३१, रा. श्री गेणशनगर कॉर्नर तळवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनजवळील रस्त्यावरुन लक्ष्मी ही तिच्या मोपेड दुचाकी (क्र.एमएच/१४/जीएल/७०९१) वरुन जात होती. यावेळी भरधाव तेजस्विनी बस (क्र. एमएच/१२/क्युडब्लु/८९०९) वरील चालक गणेश सोंडगे याने डाव्या बाजून लक्षमीला बसखाली चिरडले. बसचे चाक तिच्या डोक्यावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सध्या गणेश हा फरार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए.निकुंभ तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group