पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना – भाजप – आरपीआय (ए)- रासप – शिवसंग्राम – रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ भाजप पदाधिकाऱ्यांनी आज (शुक्रवारी) संभाजीनगर, शाहूनगर परिसरातील मतदारांच्या भेटी घेतल्या. महायुतीचे उमेदवार बारणे यांच्या प्रचाराची पत्रके वाटली. बारणे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

शाहुनगर, संभाजीनगर परिसरातील उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, ‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेवक केशव घोळवे उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याप्रचारार्थ अमित गोरखे यांनी संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी परिसर पिंजून काढला आहे. पदयात्रा काढली जात आहे. कॉर्नर सभा, बैठका घेतल्या जात आहेत.

अमित गोरखे म्हणाले, ”देशहिताची ही निवडणूक आहे. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश सुरक्षित आहे. मोदी यांच्यामुळे देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होत नाही. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी मावळमधून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. बारणे यांच्या समोरील धनुष्यबाणाच्या चिन्हावरील बटन दाबून त्यांना संसदेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.






















Join Our Whatsapp Group