पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना पिंपरी चिंचवड मधील सकल धनगर समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे. संपूर्ण मावळ मतदारसंघात सुमारे तीन लाख धनगर समाजाचे मतदार असून त्यांच्या पाठिंब्याने पार्थ पवार यांचे पारडे जड झाले आहे.
पिंपळे सौदागर येथे आयोजित मेळाव्यात धनगर समाजाच्या वतीने अभिजीत शेंडगे यांनी हा पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत आमदार सतीश चव्हाण, विक्रम कारे, नगरसेवक नाना काटे, महाराष्ट्रातील धनगर समाजाचे नेते किशोर मासाळ, मुकूंद कुचेकर, रूखमिन धर्मे, कुंदन अनुसे, गोविंद वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच धनगर समाजातील कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. यामध्ये श्रीकांत धनगर, राजेंद्र घोडके, महादेव दुर्वेकर, मनोज मारकड, काळूराम कवितके, गणेश पाटोळे, सरपंच वलेकर आदी समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी समस्त धनगर समाज बांधवांचे पार्थ पवार यांना पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. त्या म्हणाल्या की, धनगर समाजाच्या पाठिंब्यामुळे मावळमधून पार्थ पवार हे प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत. येत्या काळात पार्थ पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच धनगर समाजाच्या पाठीशी उभी राहिली. तसेच समाजाचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी पार्थ पवार हे तत्पर राहतील अशी ग्वाही देखील सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.






















Join Our Whatsapp Group