पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना पिंपरी चिंचवड वडार समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे. काळभोरनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक कचेरीत समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी वडार समाजाच्या प्रलंबित मागण्यामध्ये योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, घनश्याम शेलार, श्री.मोहिते पाटील, निरीक्षक सुनील खाटपे, मी वडार महाराष्ट्र संघटनेचे कार्याध्यक्ष तळेगाव चे नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुनील पवार, नगरसेवक राहुल भोसले, माजी नगरसेवक मनोहर शिंगाडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
य बैठकीचे नियोजन संतोष पवार, युवराज शेलार, पठाण बोटे, विठ्ठल मोरे, देविदास शिंगाडे, गणेश धोत्रे, हिरामण पवार, किरण साळुंके, अशोक लष्करे, सागर अोरसे, श्याम विटकर, मारुती धोत्रे, पंडित धोत्रे, अनंत नलावडे आदींनी केले होते.






















Join Our Whatsapp Group