पिंपरी (Pclive7.com):- डोक्यावर परिणाम झालेल्या एका ४० वर्षीय मुलाने आपल्या आईचा चिंचवड वाल्हेकरवाडी येथे चाकूने खून केला. ही घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली.
सुमन विजय सावंत (वय ६० वर्ष, राहणार गुरुद्वारा रोड वाल्हेकरवाडी चिंचवड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी भूपेंद्र विजय सावंत ( वय ४० वर्ष) यांचा शोध सुरू केला आहे.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूपेंद्र सावंत हा मनोरुग्ण असून त्याने यापूर्वी देखील आईच्या डोक्यात चाकू मारून खून करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तक्रार देण्यात आली नव्हती. त्याच्या त्रासाने वडील विजय सावंत यांचा देखील मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.






















Join Our Whatsapp Group