पनवेल (Pclive7.com):- पनवेलमधील देवेदमध्ये शिवसेनेचे मावळ मधील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पैसे वाटप करणाऱ्या एका कार्यकर्त्याविरुध्द खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक भरारी पथक प्रमुख विनोद श्रीरामजी माहोरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव संजय हिरामण पाटील असे असून त्याचे वय ३२ आहे. तो घर नंबर १०५, गावदेवी मंदिराजवळ, देवद येथे राहतो. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३३ मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या नावाच्या २३ मतदारांच्या चिठ्ठ्या सापडल्या. त्याच्याकडे २००० रुपयांच्या ३ नोटा, ५०० रुपयांच्या २२ नोटा, २०० रुपयांच्या ५ नोटा, १०० रुपये दाराच्या ८१ नोटा, तसेच रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल- भाजप सरकार कामगिरी असे लिहिलेले नोटबुक सापडले.
मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी खांदेश्वर पोलिसांनी भा. द.वि.सं कलम १७१ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.