तळेगाव (Pclive7.com):- तळेगाव दाभाडे पोलिसांनी पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ओला कॅब मधून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला तळेगाव पोलीसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील दोघांनी यापूर्वी तळेगाव, देहूरोड व हिंजवडी भागात हायवे राॅबरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.
पप्पू शिवाजी कांबळे व सनी गौतम घाडगे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तळेगाव दाभाडे पोलिसांनी या दोघांना निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सापळा रचून अटक केली आहे. या दोघांनी मुंबई पुणे प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांना लुटल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे, गुन्हे विभागाचे निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक निरीक्षक प्रमोद शिरसागर त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.