पिंपरी (Pclive7.com):- नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात प्रचंड दुष्काळ आहे. पाण्याआभावी जनावरांचे हाल सुरु आहेत. पिण्याचे पाणी, वांबोरी चारी हे प्रश्नही आ-वासून उभे आहेत. त्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्या उभारल्या आहेत. या चारा छावणीस पिंपरी चिंचवड महापालिकेचे गटनेते व मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी भेट दिली. येथील दुष्काळी भाग व जनावरांसाठी उभारलेल्या चारा छावणीची पाहणी करून आढावा घेतला.
पिण्याचे पाणी, वांबोरी चारी हे प्रश्नही तातडीने सुटले पाहिजेत. तातडीने आणखी छावण्या या परिसरात सुरु झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर तहसीलदारांनी टँकर मंजुरीचे अधिकार द्यावेत, यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सचिन चिखले यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.






















Join Our Whatsapp Group