पुणे (Pclive7.com):- साडीच्या शोरूमला आग लागून पाच कामगारांचा मृत्यू झाला ही घटना पहाटे साडेचार वाजता गुरुवारी सकाळी देवाची उरुळी येथे घडली. देवाची उरुळी येथे असलेल्या राजयोग साडी सेंटर या दुकानात आग लागली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पाच बंब आणि दहा खासगी टँकर च्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मृत कामगारांपैकी पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहे. या आगीच्या धुरात गुदमरून या कामगारांचा मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. आगीत सेंटरमधील साड्या आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहेत. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.