पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगावातील सामाजिक कार्यकर्ते योगेश पोपटराव वाघेरे यांचे अल्पशा आजाराने आज दि.१४ रोजी दुख:द निधन झाले आहे. पुण्यातील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, आणि तीन विवाहित बहिनी असा परिवार आहे.
आज रात्री ८ वाजता पिंपरीगावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. योगेश वाघेरे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.