शिरूर (Pclive7.com):- राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार आढळराव पाटील यांना चारी मुंड्या चित केलं आणि आढळरावाचं चौथ्यांदा खासदार होण्याच्या स्वप्नांना सुरूंग लावला. परंतू असं असतानासुद्धा आढळरावांनी राजकारणाचा दाखवलेला सृसंस्कृतपणा वाखण्याजोगा आहे.
अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर आढळराव पाटलांनी फेसबुक पोस्ट लिहून त्यांचं अभिनंदन केलं. अभिनंदन खासदार अमोल कोल्हे… असं कॅप्शन लिहून त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ती पोस्ट शेअर केली.
अमोल कोल्हे यांचं फॅन फॉलोविंग शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. संभाजी मालिकेमुळे ते घराघरात पोहचले आहेत. त्याचाच फायदा त्यांना झाला.
दरम्यान, तीन टर्म खासदार राहिलेले आढळराव पाटील चौकार मारण्यात अपयशी ठरले.






















Join Our Whatsapp Group