पुणे (Pclive7.com):- पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची पुणे लोकसभा मतदारसंघात खासदारपदी भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल त्यांचे पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पेढा भरवून खासदार गिरीश बापट यांचे अभिनंदन केले. यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास मडेगेरी, महिला अध्यक्षा शैला मोळक, शहर प्रवक्ते अमोल थोरात, उद्योजक नवीन लायगुडे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.