पिंपरी (Pclive7.com):- एचसीसी अल्फा इन्फ्राप्रोजेक्ट या मेट्रो स्टेशनची उभारणी करणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे १०० कामगार कर्मचारी काम करतात. महामेट्रो रेल प्रोजेक्टचे ठेकेदार अल्फा इन्फ्राप्रोजेक्टच्या वल्लभनगर येथील कार्यालयाच्या समोर आपल्या हक्काच्या पगारासाठी १ जूनपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. या कंपनीने १०० कामगारांना सहा महिन्यापासून पगार न देता केवळ एक दोन महिन्याचा पगार देऊन या कामगारांना हाकलून देण्याचा प्रयत्न झाला आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस असून महामेट्रो व संबंधीत ठेकेदारांने हे आंदोलन गांर्भीयाने घेतले नसल्याने शुक्रवार दि. ७ जून सकाळी ११ वाजता महामेट्रो कार्यालय फुगेवाडी जकात नाका येथे मोर्चा आंदोलन होणार आहे. तर सोमवार दि. १० जून सकाळी ११ वाजता कामगार आयुक्त कार्यालय स्वारगेट या कार्यालयात कामगारांचे आंदोलन होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर आणि उपोषणकर्ते कामगारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, डॉ.सुरेश बेरी, सचिन देसाई, प्रभाकर माने, अभिजीत भास्करे, सुजित चव्हाण, केदार घाटपांडे, कृष्ण स्मृती शिंदे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, एचसीसी अल्फा इन्फ्राप्रोजेक्ट या मेट्रो स्टेशनची उभारणी करणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे १०० कामगार कर्मचारी काम करतात. महामेट्रो रेल प्रोजेक्टचे ठेकेदार अल्फा इन्फ्राप्रोजेक्टच्या वल्लभनगर येथील कार्यालयाच्या समोर आपल्या हक्काच्या पगारासाठी १ जूनपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. या कंपनीने १०० कामगारांना सहा महिन्यापासून पगार न देता केवळ एक दोन महिन्याचा पगार देऊन या कामगारांना हाकलून देण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी म्हणजे १ मे रोजी या कामगारांना उपोषण आंदोलन करायला लावले. ३ मे रोजी या कामगारांना ३५ लाख रुपये दिले. उर्वरीत थकित ९० लाख रुपये कामगारांची पगाराची रक्कम देण्यासाठी पुन्हा उपोषण सुरू झाले आहे.
सबंधीत ठेकेदार, मेट्रो, प्रशासनाने कुठलीही याची दखल घेतली नाही. त्यामुळे सबंधीत ठेकदार, मेट्रोचे अधिकारी यांच्यावर आर्थिक अफरातफर, विश्वासघात, फसवणूक बाबत पिंपरी पोलिस स्टेशन, चिंचवड स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. आज दापोडी येथे पिंपरी सुरु असणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या स्थळी जाऊन तेथील कामगारांना या फसवणुकीबाबत जनजागृती पत्रके वाटप करुन जनजागृती करण्यात आली.
आज उपोषणाचा सहावा दिवस असून महामेट्रो व संबंधीत ठेकेदाराने हे आंदोलन गांर्भीयाने घेतले नसल्याने शुक्रवार दि. ७ जून सकाळी ११ वाजता महामेट्रो कार्यालय फुगेवाडी जकात नाका येथे मोर्चा आंदोलन होणार आहे. तर सोमवार दि. १० जून सकाळी ११ वाजता कामगार आयुक्त कार्यालय स्वारगेट या कार्यालयात कामगारांचे आंदोलन होणार आहे. तरी शहरातील संघटीत असंघटीत कामगार सामाजिक संस्थांनी यामध्ये सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.



















Join Our Whatsapp Group