पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना रहाटणी विभाग आणि शिवशाही व्यापारी सेनेच्या वतीने रहाटणी-थेरगाव-काळेवाडी परिसरातील बांधकाम मजूर महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसहकार सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब भांडे, शिवशाही व्यापारी सेनेचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले, मारुती मस्के, बाळासाहेब गायकवाड, निलेश भोर, गणेश पाडुळे, विशाल बाविस्कर, गोरख पाटील, आशिष वाळके, रविकिरण घाटकर, दत्ता गिरी, शिवशाही बांधकाम मजूर आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दादा देडे, अनिल जाधव, अमोल तेलंगे, शुभम गायकवाड, दत्ता कांबळे, बजरंग जाधव, सुशाबाई धनवटे, उषाबाई माने, मल्लिका मंडले, शिलाबाई कांबळे, मुक्ताबाई मोरे आदी उपस्थित होते.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाही व्यापारी संघ संलग्न शिवशाही बांधकाम मजूर आघाडीच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
सन्मानित करण्यात आलेल्या बांधकाम मजूर महिलांनी युवराज दाखले यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळावे असे शुभाशीर्वाद यावेळी दिले.