पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने आज पुरूषांनी वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. गेल्या चार वर्षांपासून या संस्थेच्यावतीने वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात पुरूषांनी वटसावित्री साजरी करण्याचा पहिला उपक्रम राबणारी ही संस्था आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. अश्वपती राजाची मुलगी सावित्री हिने सत्यवानशी विवाह करून जंगलात रहावयास गेली. एके दिवशी यम सत्यवानाला घेऊन जात आसताना ती यमाबरोबरच गेली. शेवटी यमाने सत्यवान सोडून काहीही माग असे सांगितले, तेव्हा तिने मला मुल द्या म्हणून सांगितले तेव्हा यमाने,” तथास्तु” असे म्हटले. फसलेल्या यमाने सत्यवानाला वटवृक्षाच्या झाडाखाली सोडून दिले. या दिवशी सात प्रदक्षिणा घालून दीर्घ आयुष्य असणाऱ्या वटवृक्षाला सूत गूंडाळूण मनोभावे पूजा करतात. सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणले. या कथेचे स्मरण करून वटवृक्षाची पूजा करून,”सौभाग्य मागण्याचा हा दिवस”म्हणून साजरा केला जातो.
प्रत्येक महिला वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे, व सात जन्मी हाच पती परमेश्वर म्हणून मिळावा म्हणून दीर्घ आयुष्य असणाऱ्या वटवृक्षाची पुजा करण्याची प्रथा आहे. या यंत्रयुगात पत्नी व पती यांना समान कायद्याने आधिकार दिले आहेत. पुरूषप्रधान देशात महिला पण पुरूषांच्या खांद्याला खांदा देउन प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. मग पुरुषांनेही जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी म्हणून वटपौर्णिमा साजरी केली तर वावगे ठरू नये. म्हणून आम्हाला सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून आम्ही वटवृक्षाची फेऱ्या मारून सुत घालून मनोभावे पूजा केल्याचे समाधान मिळाले, असे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी बोलताना सांगितले.
वटवृक्षाची पूजा केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांच्या हस्ते वटवृक्षाचे वृक्षारोपण या परिसरात करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, सचिव गजानन धाराशिवकर, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड, युवक सचिव अक्षय जगदाळे, हेमंत नेमाडे, आळंदी शहर सचिव रवि भेंनकी, आप्पाजी चव्हाण, प्रकाश बंडेवार, हनुमंत पंडित, वसंतराव चकटे, पंडित वनसकर, वामन भरगंडे, सुर्यकांत कुरुंदकर, राजेंद्र गोराने, मुरलीधर दळवी, ईश्वर सोनोने, सचिन सागवे, बदाम कांबळे, विनायक बिराजदार, प्रदिप बोरसे, रविंद्र सुरवे, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group