पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीत १९ व्या मजल्यावर काम करत असताना पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. तर दोन कामगार जखमी झालेत. ही घटना बुधवारी (दि.१०) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरी येथे घडली. राजकुमार अशोक घोसले (वय २४, रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमध्ये म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू आहे. त्या इमारतीवर अनेक कामगार काम करत आहेत. राजकुमार या साईटवर प्लास्टरचे काम करत होता. क्रेनवर उभा राहून प्लास्टर करत होता.क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने क्रेन १९ व्या मजल्यावरून खाली आली. या अपघातात राजकुमार गंभीर जखमी झाला. तर अन्य दोन कामगार किरकोळ जखमी झाले. तिघांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, राजकुमार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group