नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण परिसरात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. यामुळे धरणातील पाण्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज (शनिवारी) रात्री १२ वाजल्यापासून ९ हजार ९३२ क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणात सध्या ९८ टक्क्याहून अधिक पाणीसाठा असून सकाळी ६ वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे आज रात्री १२ वाजल्यापासून धरणाचे ६ दरवाजे एकूण २ फूटाने उचलण्यात येतील. त्यातून १,४०० हायड्रो आणि सांडव्यातून ८,५३२ असे एकूण ९,९३२ क्युसेक्स वेगाणे विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group