पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या रॅलीला सुरुवात केली आहे. दुपारी प्राधिकरणातील निवडणूक कार्यालयात ते आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी सकाळी जुनी सांगवी येथून त्यांनी आपल्या रॅलीला सुरुवात केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने जगताप समर्थक उपस्थित होते.
जुनी सांगवी येथून ही रॅली सुरू झाली. त्यानंतर चौकाचौकात समर्थकांकडून फटाक्यांची आतिषबाजी मोठ-मोठे हार तसेच महायुतीच्या जोरदार घोषणा देऊन लक्ष्मण जगताप यांचे स्वागत करण्यात येत होते. त्यानंतर पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव, तिंचवड, वाल्हेकरवाडी मार्गे प्राधिकरण येथील निवडणूक कार्यालय येथे ही रॅली संपणार आहे. त्यानंतर लक्ष्मण जगताप महायुतीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या रॅलीमध्ये भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.