पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेतून भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार गिरीष बापट, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव उपस्थित होते.
तत्पुर्वी आज सकाळी पिंपळेगुरव येथून भव्य रँली काढून लक्ष्मण जगताप यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. पिंपळेगुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव, चिंचवड, वाल्हेकरवाडी मार्गे प्राधिकरण येथील निवडणुक कार्यालयापर्यंत भव्य रँली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी, चौकाचौकात समर्थकांकडून फटाके, हार, ढोल ताशांनी लक्ष्मण जगताप यांचे स्वागत करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group