पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडीतील माजी नगरसेवक सुरदास तुकाराम गायकवाड यांचे दिर्घ आजाराने बुधवारी २० नोव्हेंबर २०१९ रोजी दुःखद निधन झाले आहे. ते ५१ वर्षांचे होते. फुगेवाडीतील स्मशानभूमीत बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, चार पुतणे,असा मोठा परिवार आहे.
सुरदास गायकवाड हे १९९७ साली शिवसेनेतर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर २००७ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू पुन्हा नगरसेवक पदी निवडून आले होते. तसेच २०१२ साली त्यांच्या पत्नी संध्या गायकवाड यांना नगरसेवकपदी निवडून आणले होते. फुगेवाडी गावामध्ये मुस्लिम समाजासाठी दफनभूमी व ईदगाह बुध्द धर्मीयांसाठी बुध्दविहार व गावातील विठ्ठल मंदिराचे जीर्णोध्दारच्या कामासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील टकारी समाजाचे संघटन करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याची तळमळ असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दुख: व्यक्त होते.






















Join Our Whatsapp Group