पिंपरी (Pclive7.com):- मी राष्ट्रवादीतच आहे आणि कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे. चिंता करण्याचं काही कारण नाही. भाजप आणि राष्ट्रवादी ५ वर्षे स्थिर सरकार देणार आहे असं ट्विट करून अजित पवार यांनी राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. शनिवारी भाजपाशी हातमिळवणी करून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला होता. आता बऱ्याच नाट्यमय घडामोडींनंतर आज काही मिनीटांपुर्वी अजित पवार यांनी हे ट्विट केलं आहे.

अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच आहोत आणि शरद पवार साहेब हेच आपले नेते आहेत. असं त्यांनी ट्विट केलं आहे. चिंता करण्याचं काहीच कारण नाही, सर्व काही व्यवस्थित आहे, तथापि थोडा वेळ शांतता गरजेची आहे. भाजप-राष्ट्रवादीची युती महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल आणि आगामी ५ वर्ष हेच सरकार टिकेल असं देखील अजित पवार यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना शांतता राखा असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group