पुणे (Pclive7.com):- कोथरूडला भरदिवसा गोळीबार करून सराफी दुकान लुटल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वी घडली आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी चोरट्यांनी येथून लाखो रुपयांचे दागिने नेले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
कोथरूड परिसरात आंनदनगर भागात मुख्य चौकात पेठे ज्वेलर्स आहे. दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास अचानक दोघे जण दुकानात घुसले. त्यांनी कंबरेला लावलेले पिस्तुल बाहेर काढून दुकानातील मालक आणि कामगारांना धमकावत दुकान लुटण्यास सुरवात केली. कामगारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता एकाने पिस्तूलमधून हवेत एक गोळी झाडली. त्यानंतर दुसरी गोळीही झाडण्यात आली. दोघांनी येथून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. दरम्यान चोरटे तेथून दुचाकीने चांदणी चौकाच्या दिशेने पसार झाले. काही वेळातच ही माहिती वाऱ्या सारखी पसरली. कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यानी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीचा मग सुरू केला आहे. कोथरूड सारख्या शांत परिसरात भरदिवसा हा थरार घडल्याने मोठी खळबळ माजली आहे. बघण्यानी याठिकाणी एकच गर्दी केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.






















Join Our Whatsapp Group