पिंपरी (Pclive7.com):- पती दारू पिऊन घरी आल्यावर झालेल्या भांडणातून पत्नीचा खून करून तिनेच आत्महत्या केल्याचा बनाव पतीने रचला. खुनी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.३०) पहाटे तीनच्या सुमारास बावधन येथे उघडकीस आली. अयोध्या विजय कहाळे (वय २२, रा. विघ्नहर्ता बिल्डिंग, कर्नाटक बँकेसमोर, बावधन) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी तिचा पती विजय विठ्ठल कहाळे (वय २८) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्र्यंबक उमराव बोबडे (वय २९,रा. टाकळे बोबडे ता. जि. परभणी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २९) रात्री आरोपी विजय हा घरी दारू पिऊन आला होता. या कारणावरून अयोध्या आणि विजय यांच्यात भांडण झाले. यावेळी चिडलेल्या आरोपी विजयाने अयोध्या यांच्या कपाळावर काहीतरी मारले. त्यानंतर दोरीने गळा आवळून तिचा खून केला. हा खून लपवण्यासाठी आरोपी विजय याने अयोध्या यांना ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी त्याचे पितळ उघडे पाडले. आरोपी पतीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group