पिंपरी (Pclive7.com):- दापोडी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागेश जमादार यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकामध्ये त्यांच्या कुटूंबियातील सदस्याला नोकरी देण्यात यावी अशी मागणी पिंपरी युवासेनेकडून तहसिलदार गीता गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.
दापोडी येथे झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अमृत जलवाहिनी योजनेच्या कामामुळे खोदण्यात आलेल्या मजुराचा पालिकेच्या व ठेकेदाराच्या ढिसाळ आणि दुर्लक्षित कारणामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमुरुन दुर्देवी अंत झाला. नागेश जमादार असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढविले आहे. नागेश हा घरातील एकटा कमवता होता. त्याच्या मागे चार बहिणी व आई वडील असा मोठा परिवार असून त्यांचा उधरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व पालिकेत कायम स्वरूपाची नोकरी देण्यात यावी अशी मागणी पिंपरी युवासेनेने तहसिलदार गीता गायकवाड यांच्याकडे केली आहे. यावेळी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, विकास गायकवाड, सिद्धार्थ पगारे, अविनाश जाधव उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group