पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘सोशल मीडिया एक्सपर्ट’ पदाच्या गोंडस नावाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांना पोसण्याचा उद्योग सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांचा कर रूपातून आलेला पैसा शहराच्या विकास व कल्याणकारी योजनासाठी खर्च केला जातो. मात्र याच पैशाचा दुरुपयोग करत सत्ताधारी भाजपकडून बहुमताचा जोरावरती भाजपच्या (अमोल देशपांडे) या कार्यकर्त्यांला “विटामिन एम” (मलईचा बूस्टर डोस) देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे.
महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यापासून अनेक कामांमध्ये सल्लागार समिती नेमली गेली आहे. शहरात चालू असणाऱ्या विकास योजनांची माहिती पालिकेच्या वेबसाईटवर सर्व नागरिकांना मिळते. परंतु स्थायी समितीत सत्ताधाऱ्यांनी कार्यकर्त्यांना जोपासण्यासाठी नव्याने सोशल मीडिया एक्सपर्ट पदभरती विरोधकांचा विरोध न जुमानता मंजूर दिली आहे. अनेक कामासह वेगवेगळ्या सल्लागार एक्सपर्टच्या नेमणुकीखाली जनतेचा पैसा लुटण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. स्थायी समितीत “विटामिन एम” वरून रोज तू तू मै मै सुरू असल्याचे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. जनतेचा पैसा लुटणार्या सत्ताधाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही असे नाना काटे यांनी म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group