पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज पिंपरी-चिंचवड शहरात जंगी स्वागत करण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ते आज पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
आकुर्डी येथे आज पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजित पवारांच्या उपस्थित एका बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची अजितदादा संवाद साधणार आहेत आकुर्डी येथे अजितदादा दाखल होताच फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक डब्बू आसवानी, तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group