पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर यापुढे टीका केल्यास घरात घुसून समाचार घेऊ असा इशारा अमृता फडणवीस यांना पिंपरी चिंचवड शिवसेना महिला आघाडीच्यावतीने देण्यात आला. पिंपरीत आज अमृता फडणवीस यांच्या फोटोला पिंपरी चिंचवड शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘ठाकरे’ नाव असले म्हणजे कोणी ‘ठाकरे’ होत नाही असे वक्तव्य केले होते. केवळ सत्ता गेल्याने नैराश्येमुळे केविलवाणी टिका करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आज पिंपरी चौकात अमृता फडणवीस यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर या पुढे टीका केल्यास अमृता फडणवीस यांच्या घरात घुसून शिवसेना महिला आघाडी समाचार घेईल असा इशारा यावेळी देण्यात आला. त्याची सर्व जबाबदारी पतीचे ही न ऐकणाऱ्या अमृता फडणवीस यांच्यावर राहील असेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. या आंदोलनात नगरसेविका मीनल यादव, चिंचवड शहर संघटिका अनिता तुतारे, उपशहर संघटिका शशिकला उभे, आशा भालेकर, वैशाली मराठे, पिंपरी युवतीसेना प्रमुख प्रतिक्षा घुले, चिंचवड युवतीसेना प्रमुख शर्वरी जळमकर, नंदा दातकर, जनाबाई गोरे, वर्षा भालेराव, वैभवी घोडके, कामिनी मिश्रा, नजमा शेख, भारती चकवे, भाग्यश्री मस्के, स्मिता मोगरे, निर्मला पाटील, कविता बॅनर्जी यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुरज लांडगे, सचिन सानप, कुणाल जगनाडे, पिंपरी विधानसभा संघटक रोमी संधू, विभाग संघटक निलेश हाके, अमित शिंदे, नितीन बोंडे, चंद्रकांत जाधव, प्रवीण पाटील, प्रकाश जाधव, किशोर शिंदे व शहर समन्वयक सर्जेराव भोसले यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.






















Join Our Whatsapp Group