तळेगाव मावळ (Pclive7.com):- दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी तळेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच येथील र्ट्रस्टी किसनजी थुल यांची भेट घेऊन येथील माहिती घेतली. त्यानंतर दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना मावळ तालुका, पुणे जिल्हाच्या नवीन सभासदांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली.
यामध्ये पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख – शशिकांत वि.चव्हाण, अंदर मावळ अध्यक्ष – अविनाश भालेराव, उपाध्यक्ष – संदिप सोनवणे, कार्यध्यक्ष – संतोष वंजारी, संघटक – किरण हेमाडे, उपाध्यक्ष देहुरोड शहर – दिनेश तेलगू, अध्यक्ष सोमाटणे – वैभव चव्हाण, उपाध्यक्ष – राहुल साळवे, उपाध्यक्ष लोणावळा – हर्षल बनसोडे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे बाप्पा शिंदे, बाळासाहेब पवार, अमित वर्मा, अमित मैश्राम, दादा ढवळे, सम्राट निकाळजे, तेजस निकाळजे, कुमार चव्हाण, सिद्धार्थ निकाळजे, महेंद्र गायकवाड, मंगेश गायकवाड, प्रविण ओव्हाळ, सागर कांबळे, बंटी तांबे, अनोज देसाई, अतुल देसाई यावेळी बाळासाहेब पवार यांनी सुञसंचालन केले आणि तेजस निकाळजे यांनी आभार मानले.