पिंपरी (Pclive7.com):- दापोडीमध्ये असलेल्या मिलिटरी इंजिनियरिंग कॉलेज (सीएमई)मध्ये जवानांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणा दरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाला. तर पाच जवान जखमी झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. दापोडी येथील मिलिटरी इंजिनियरिंग कॉलेज येथे पुल बांधण्याच्या सरावादरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोडीतील सीएमईमध्ये जवानांना पूल बांधणीचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यावेळी पूल बांधणीसाठी लागणारे साहित्य किंवा त्याचाकाही भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला तर पाच जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेबाबत वरिष्ठांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group