सातारा (Pclive7.com):- भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती खालावली असून त्यांना रक्तदाबाचा त्रास झाल्याने अगोदर सातारा येथे उपचार केल्यानंतर आता त्यांना मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
शिवेंद्रराजे भोसले हे मंगळवारी रात्री त्यांच्या सुरुची बंगल्यावर होते. त्यावेळी त्यांना रात्री उशीरा अचानक रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. त्यांना कुटुंबियांनी तात्काळ प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना बरं वाटल्यास घरी सोडणार असल्याचे रात्री उशिरा डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी त्यांना मुंबईत आणण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group