पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेचे गोंदिया-तिरोडा विधानसभेचे संपर्कप्रमुख व शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले हे मनसेच्या वाटेवर आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाजाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी ते शिवसेनेला जयमहाराष्ट्र करून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेत प्रवेश करणार अाहेत.
युवराज दाखले हे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. त्यांनी शिवसेनेकडुन पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुक लढविली असून त्यांनी ३०९५ मतदान घेतली होती. त्या निवडणुकीत पँनल विस्कळीत झाल्याने तसेच शिवसेना स्थानिक नेत्यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. तसेच शिवशाही व्यापारी संघ स्थापन करून राज्यात जवळपास २२ जिल्ह्यांमध्ये मुंबईसह व्यापारी संघाचे काम चालु आहे. त्याच बरोबर दाखले हे मातंग समाजाचे महाराष्ट्रामधील नेतृत्व असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मनसेची बळकटी वाढणार आहे.
नुकतेच मनसेचे नेते राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे मातंग समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. तसेच यापुढे मातंग समाजाचे प्रत्येक प्रश्न सोडवणार असल्याचे वचन दिले होते. राज ठाकरे यांच्या त्याच आश्वासनाला प्रेरित होऊन मनसेत प्रवेश करणार अाहे.
– युवराज दाखले