पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील साई चौकात (पिंपळे सौदागर-वाकड रस्त्यावर) उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या एक-दोन आठवड्यात हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या सुरू असलेल्या कामाची नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी करत आढावा घेतला.
साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक दळणवळण असलेल्या परिसरातील चौक आहे. परंतु या परिसरामध्ये वाहतूक विषयी समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे बी.आर.टी यांच्या मार्फत साई चौक येथे भुयारी मार्गाचे काम प्रगती पथावर असुन येत्या दोन आठवड्यामध्ये वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
या भुयारीमुळे या परिसरामध्ये IT कंपनी हिंजवडी हबमध्ये काम करणारा मोठा वर्ग व रहिवासियांना सतत होणाऱ्या वाहतुक कोंडीच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या भुयारीमार्गामुळे हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना वाहतूकीसाठी सत्तर टक्के मार्ग मोकळा (ट्रॅफिक फ्री) मिळणार आहे. या भुयारीमार्गामुळे विशाल नगर, वाकड, हिंजवडी जाण्यास अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर झाला असुन या परिसरातील वाहतूक कोंडीचा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे.






















Join Our Whatsapp Group