पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत रिक्त झालेल्या ८ सदस्यांच्या जागेवर भाजपच्या भिमा फुगे, सुवर्णा बुर्डे, शशिकांत कदम, अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे यांची निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून सुलक्षणा शिलवंत, पौर्णिमा सोनवणे यांची आज (दि.२६) झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या.
महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. त्यातील भाजपाचे ६ आणि राष्ट्रवादीच्या २ सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नव्या सदस्यांची निवड आज झाली. या रिक्त झालेल्या जागांवर भाजपच्या भिमा फुगे, सुवर्णा बुर्डे, शशिकांत कदम, अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे यांची तर राष्ट्रवादीकडून सुलक्षणा शिलवंत, पौर्णिमा सोनवणे यांची सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली.
सभागृह नेते नामदेव ढाके यांनी भाजपच्या तर राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी स्थायीच्या सदस्यांची नावे बंद पाकिटातून महापौर माई ढोरे यांच्याकडे दिली. त्यानंतर संबंधीतांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर माई ढोरे यांनी केली.
स्थायी समितीमधील १६ सदस्य
भाजपा – आरती चोंधे, शीतल शिंदे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे,भिमा फुगे, सुवर्णा बुर्डे, शशिकांत कदम, अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे
अपक्ष – झामाबाई बारणे
राष्ट्रवादी – मयुर कलाटे, पंकज भालेकर, सुलक्षणा शिलवंत, पौर्णिमा सोनवणे
शिवसेना – राहुल कलाटे






















Join Our Whatsapp Group