पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व पिपंरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हाॅटेल घरोंदा, मोरवाडी पिंपरी या ठिकाणी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
अखिल भारतीय युवक काँग्रेसने देशभरात राष्ट्रीय बेरोजगार नोंदणीची मागणी केली आहे. भारतातील बेरोजगारीवर युवकांचे विचारमंथन व्हावे, युवकांमधील ऊर्जावान व सक्षम वक्ता पुढे यावा व त्यांना युवक काँग्रेसच्या विचारधारेमधे काम करण्याची संधी मिळावी, यासाठी बेरोजगारी सारख्या ज्वलंत विषयावर वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची जिल्हास्तरीय फेरी ०८ मार्च रोजी संपूर्ण जिल्ह्यांमध्ये व राज्यस्तरीय फेरी १५ मार्च रोजी राज्यस्तरावर घेण्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने निश्चित केले आहे.
स्पर्धेमध्ये १८ ते ३५ या वयोगटातील युवक सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेचे विषय
१) “मोठा बाबा शिकला आणि घरीच असतो आता”
२) “हिंडतो दाही दिशांना प्रश्न माझ्या नोकरीचा “
३) “साहेब सांगा अमा बेरोजगारांचे तुम्ही काय करायचे ठरवले आहे?”
हे बेरोजगारीशी संबंधित विषय आहेत. यापैकी कुठल्याही एका विषयावर स्पर्धकाला आपले मत व्यक्त करावे लागेल. स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल व जिल्ह्यातून दोन विजेत्यांना राज्यस्तरावर सहभागाची संधी देण्यात येईल. स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख प्रथम ३००० रु. द्वितिय २००० रु. तृतीय १००० रु बक्षिसांचे सुद्धा प्रयोजन करण्यात आले आहे. स्पर्धे मध्ये सहभागी होण्यासाठी https://bit.ly/SpeechonNRU?fbclid=IwAR0grRbiLQnNPm-hY7YrBI36qjMOm-94r_t05rZvn9N5d-i0fKdXo5l0Fm4 या गुगल लिंकवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत आपल्या नावाची नोंदणी करावी. असे आवाहन युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले आहे.
अधिक माहीतीसाठी संपर्क :
नरेंद्र बनसोडे
९८६०१७७१७७






















Join Our Whatsapp Group