पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया आज (दि.२) सुरू झाली. दुपारी ३ ते ५ या वेळेत नगरसचिव कार्यालयात उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची मुदत होती.
स्थायी समितीमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त असून देखील राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध न करण्यासाठी पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, मयूर कलाटे, प्रविण भालेकर, नगरसेविका पोर्णिमा सोनवणे आदी उपस्थित होते. स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक शुक्रवार दि.६ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवणार की माघार घेत ही निवडणूक बिनविरोध होणार हे त्याच दिवशी स्पष्ट होईल. परंतू तुर्तासतरी या निवडणूकीत रंगत आली असल्याचे चित्र आहे.






















Join Our Whatsapp Group