पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपाकडून संतोष लोंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया आज (दि.२) सुरू झाली. दुपारी ३ ते ५ या वेळेत नगरसचिव कार्यालयात उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची मुदत होती.
स्थायी समितीमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे या निवडणूकीत भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे. संतोष लोंढे यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, राहुल जाधव, भिमा फुगे, आदी उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे या निवडणूकीत रंगत आली आहे. स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक शुक्रवार दि.६ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज कायम राहणार की ते शेवटच्या क्षणी माघार घेणार हे त्याच दिवशी स्पष्ट होईल.






















Join Our Whatsapp Group