पिंपरी (Pclive7.com):- शालेय परिसरामध्ये विद्यार्थिनींना छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागू नये, चुकीचे वर्तन करणार्यांवर वेळीच कारवाई व्हावी तसेच विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात सुसंवाद वाढावा यासाठी भोसरी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. भोसरी पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. कैलासे यांनी फुगेवाडी येथील कै.मिनाबाई ठाकरे शाळेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

विद्यार्थिनींसोबत काही गैरप्रकार होत असल्यास कोणालाही न घाबरता पोलिसांना कळवावे असे आवाहन कैलासे यांनी यावेळी केले. पीएसआय कदम मॅडम, पोलीस नाईक नागरे, युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचत गटाच्या शीतल जाधव, मुख्याध्यापिका पवार मॅडम, पानसरे मॅडम, माने सर आदी यावेळी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group