पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी न्यायालयात कोरोना व्हायरसचे उपाय म्हणून मास्कचे वाटप पिंपरी चिंचवड बार असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी नाशिक कारागृहचे तुरुंगाधिकारी संतोष कोकणे यांनी वायरस थांबवण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना झाल्या पाहिजे यासंबंधी माहिती दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अँडव्होकेट दिनकर बारणे, उपाध्यक्ष अतुल आडसरे, सचिव सुजाता बिडकर, सहसचिव पूनम राऊत तसेच अँडव्होकेट आतिश लांडगे, अँडव्होकेट संजय दातीर पाटील, माजी अध्यक्ष सतीश गोरडे व इतर वकील मान्यवर उपस्थित होते. शंभर ते दीडशे वकील व पक्षकारांना मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी कोरोना व्हायरस विषयी उपस्थितांना प्रबोधन करण्यात आले.