पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरपीआयच्या पिंपरी चिंचवड शहाराध्यक्षाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. सुरेश निकाळजे असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी हा रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) शहराध्यक्ष आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या हत्येचा आरपीआयच्या शहाराध्यक्षाने कट रचला. याबाबत डब्बू आसवानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यावर चौकशी करून पोलिसांनी कलमवाढ करून गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी निकाळजे याला अटक केली. न्यायालयाने सुरेश निकाळजे याला चार दिवसांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group