पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत यापुढील नगरसेवकपदाचे सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सात महिन्याचे एक लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आणि उर्वरित 15 महिन्याचे मानधन ‘आरएसएस’च्या जनकल्याण समितीला आणि दोन स्वयंसेवी संस्थांना खासगी खात्यातील धनादेशाद्वारे दिले आहे. या निर्णयामुळे नगरसेविका चिंचवडे यांचे कौतुक होत आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले असून सात महिन्याचे दरमहा मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस वर्ग करण्याबाबत कळविले आहे.
कोरोनाने जगात थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोनामुळे काही जणांचा बळी गेला आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि स्थिर-स्थावर होण्यासाठी दिर्घ कालावधी लागणार आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी यापुढील 22 महिन्याचे नगरसेवकपदाचे सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांना महिन्याला 15 हजार रुपये मानधन मिळत आहे.
सात महिन्याचे एक लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे. दर महिन्याला ते वर्ग करावे, असे पत्र आयुक्तांना दिले आहे. तर, उर्वरित 15 महिन्याचे मानधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या निधीस आणि दोन स्वंयसेवी संस्थांना दिले आहे. प्रशासकीय अडचण येऊ नये यासाठी खासगी खात्यातील धनादेशाद्वारे दिले आहेत.
नगरसेविका चिंचवडे म्हणाल्या, ”कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण भारत देशासह जगामध्ये चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि स्थिर-स्थावर होण्यासाठी दिर्घ कालावधी लागणार आहे. कोरोनाच्या लढाईत हातभार लावावा यासाठी यापुढील सर्व मानधन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जवळ ठेवणार नाही. सात महिन्याचे एक लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार आहे. तर, उर्वरित 15 महिन्याचे मानधन संघाच्या जनकल्याण समितीच्या निधीस आणि दोन स्वंयसेवी संस्थांना अॅडव्हान्स धनादेशाद्वारे दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून लोकाभिमुख कार्य मी अनेक वर्षांपासून पाहत आहे”.






















Join Our Whatsapp Group