पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांची चिंता वाढणारी एक बातमी समोर आली आहे. शहरात कोरोनाचा धोका वाढला असून आज एकाच दिवशी नवीन ६ जणांचे कोरोनाचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या ९ वर पोहचली आहे. ४ रूग्ण वायसीएम मध्ये तर २ जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधून आज दि.०४ पर्यंत एकुण ४२० व्यक्तींचे करोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आज रात्री १०.३० वाजता प्राप्त अहवालानुसार ०६ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे शहरामधील आत्तापर्यंत एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २१ झालेली आहे. त्यापैकी १२ रुग्ण बरे झालेले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले असून त्यांना घरामध्ये १४ दिवस अलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सध्या शहरातील रुग्णालयात असणा-या पॉझिटीव्ह ०९ रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.






















Join Our Whatsapp Group