पिंपरी (Pclive7.com):- रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केले होते. त्यांच्या या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता देशवासीयांना उत्तम प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटवत पिंपरी चिंचवडकरांनी देखील कोरोना विरूध्दच्या या लढ्यात पंतप्रधानांना पाठींबा दर्शविला.
शहरात अनेक ठिकाणी लोकांनी यासाठी घरातील मेणबत्त्या काढून ठेवल्या होत्या. जिथे थोड्याफार प्रमाणात दुकाने सुरू होते तेथे दिवाळीच्या पणत्या विकायला आल्या होत्या. रात्री ९ वाजेपासून अनेक घरांमध्ये दिव्यांची आरास दिसत होती. नियमित लाइट्स बंद ठेवून जनतेने मोदींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला होता. काही ठिकाणी ‘गो करोना’च्या घोषणा देऊन फटकेही फोडण्यात आले.






















Join Our Whatsapp Group