पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री ९ वाजता ९ मिनीटे दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तसाठा कमी झाल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या सूचनेनुसार आज पिंपरी चिंचवडमध्ये रात्री ९ वाजता युवक काँग्रेसच्या ९ कार्यकर्त्यांनी रक्तादान केले. सोशल डिस्टनसिंग नियमानुसार गर्दी न करता पहिल्या टप्प्यात ९ जणांनी रक्तादान केले.

चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष संदेश बोर्डे, शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे, विधानसभा सरचिटणीस रोहित शेळके, नरेन्द्र कसबे, अमोल कर्डक, संतोष साळवी, योसेफ बळद, अर्पीत साळवी, ज्योत्स्ना साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group