पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण जगासह भारत देशही कोरोनाच्या संकटात सापडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर केलायं. मात्र या लॉकडाऊनमुळे सर्वसमान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर हातावरचं पोट असणारे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आलीयं. या परिस्थितीत एक हात मदतीचा या भावनेतून एसकेएफ गणेश मित्र मंडळातर्फे चिंचवडेनगर येथील परप्रांतीय तसेच गरजू नागरिकांना गृहउपयोगी वस्तू व धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळाचे सभासद नाथा चव्हाण, देवेंद्र घोडके, सय्यद मामा, सुहास शहा, लोकेश केरे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group