पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण जगासह भारत देशही कोरोनाच्या संकटात सापडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर केलायं. मात्र या लॉकडाऊनमुळे सर्वसमान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर हातावरचं पोट असणार्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आलीयं. या परिस्थितीत एक हात माणुसकीचा.. एक हात मदतीचा.. या भावनेतून रावेत, वाल्हेकरवाडी प्रभागाचे भाजपाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी परिसरातील गरजू गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. विशेष म्हणजे पाटील यांनी या वस्तूंचे वाटप कोणतेही वाहन न वापरता सायकलवरून केले आहे.

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाने आणि महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या सहकार्याने शशिकांत पाटील यांनी हा उपक्रम राबविला आहे. प्रभाग क्रमांक-16 वाल्हेकरवाडी, सायली कॉम्पलेक्स, गुरूव्दारा, रावेत परिसरातील अत्यंत गरजू ज्यांच्याकडे रेशनिंगचे कार्डच नाही असे नागरिक व गोरगरीब, मोलमजुरी करणारे नागरीक व हातावर पोट भरणारे नागरिकांना तांदुळ, दाळ, तेल, कांदे, बटाटे, गहूचे पीठ असे पॅकेज करून १३८ नागरिकांना घरपोच “सायकलवर ” जाऊन शशिकांत पाटील यांनी साहित्य वाटप केले. फोर व्हिलर नाही व लाॅकडाऊन असल्यामुळे टेम्पो भाडयाने मिळत नाही. पेट्रोल, डिझेलची सर्वात मोठी अडचण असल्यामुळे, सोशल डिस्टंसिंग तसेच सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून सायकलचा पर्याय निवडून शशिकांत पाटील यांनी गरजू नागरिकांना मोफत शिधा वाटप घरपोच केले आहे.






















Join Our Whatsapp Group