पिंपरी (Pclive7.com):- लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४- डि-२ च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात २ हजार गरीब कुटुंबीयांना अन्नधान्य देवून मदतीचा हात दिला.
लायन्स क्लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, भुकेपासून मुक्ती (रिलिव्ह हंगर) उपक्रमाचे जिल्हा प्रमुख अब्दुल जाफर यांच्या मार्गदर्शनाखाली बिनॉय जाफर, व्ही.एम कबीर, हाजरा कबीर, कमरुनिस्सा शेख यांनी सोशल डिस्टंसिंग ठेवून जेवणाचे पाकिटे व अन्नधान्य किट्चे वाटप केले. दररोज दोनशे गरिबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. कै.यशवंत चव्हाण रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईक, कुदळवाडी, ओटा स्कीममधील अंध अपंग, हिंजवडी फेज२ मधील कामगार, भोसरी, लिंक रोड झोपडपट्टी, भाटनगर,रमाई नगर, गांधी नगर पिंपरी, देहूरोड या परिसरातील गरीब व गरजूंना वाटप केले.






















Join Our Whatsapp Group