पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात मागील चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आणखी एक कोरोनाचा ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळला आहे. ३६ वर्षीय तरूणाचे रिपोर्टमध्ये त्याला लागण झाल्याचे स्पष्ट झालेयं. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९ पोहोचली आहे. शहरात आजपर्यंत २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित ९ रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.
कोरोनाचे आज दि.०८ रोजी सायं. ६.३० वाजेपर्यंतचे अपडेटस् खालील प्रमाणे
सध्या पॉझिटिव्ह असलेले रूग्ण संख्या – ०९
रूग्णालयात आज दाखल झालेले संशयित रुग्ण -२६
आज पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या – ०१
आज निगेटीव्ह रुग्णांची संख्या – ४९
चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण संख्या – ०८
रुग्णालयात दाखल रुग्ण – ३४
डिस्चार्च झालेले रुग्ण – ३४
सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – ७ लाख ४७ हजार २४९






















Join Our Whatsapp Group