पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आणखी एक महिला ‘कोरोनाग्रस्त’ झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशीरा या महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळं शहरातील ‘कोरोनाग्रस्त’ रूग्णांची संख्या १० वर पोहचली आहे. तर आज पर्यंतच्या बाधित रूग्णांचा आकडा २२ झाला आहे. यापैकी १२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. तर उर्वरित १० रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.
पिंपरी चिंचवड शहरात आज आणखी एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली आहे. ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती, तिची ‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ काय होती हे अद्याप समजू शकले नाही. परंतू प्रशासनाकडून तिची सर्व माहिती काढण्याचे काम सुरू आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांना महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्ययकीय विभागाने दिली.






















Join Our Whatsapp Group