पिंपरी (Pclive7.com):- राज्यासह देशावर कोरोनचं मोठं संकट आलं आहे. सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. दरम्यान बाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ देखील होत आहे. अशा नाजुक परिस्थितीत सरकारकडून स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांना कोणत्या कारणांसाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे संसर्ग होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या स्विगी आणि झोमॅटोची डिलेव्हरी करणार्यांमुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची जबाबदार कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत स्विगी, झोमॅटोची सेवा तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर भाजपाची युवती प्रमुख तेजस्विनी कदम यांनी केली आहे.
तेजस्विनी कदम यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन केले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या संपुर्ण देश कोरोनाच्या संक्रमणातून जात आहे. अशा काळातच देशात कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत.अशा नाजूक परिस्थितीत सरकार स्विगी, झोमॅटो सारख्या कंपनीना अश्या कोणत्या कारणांसाठी परवानगी देत आहेत. कोरोना संक्रमण होण्याआधी जशी त्यांची कामाची पध्दती होती. तीच पध्दती ते सध्या वापरत आहेत. काही ठिकाणी तर ह्या कंपनीच्या नावाखाली अनेक अवैधरित्या बंदी असलेल्या पदार्थांची वाहतुक होत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. एक सजग समाजसेवक म्हणून विनंती आहे की सदर विषयांचा सखोल विचार करावा. आवश्यक वाटल्यास तज्ञ मंडळीची मदत घेऊन, ही सेवा तात्काळ बंद करावी. जेणे करून पुढील गंभीर धोका समाजाला व देशाला होणार नाही अशी मागणी तेजस्विनी कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group