पिंपरी (Pclive7.com):- पिंपळेगुरव येथील एका २५ वर्षीय महिलेचे रिपार्ट आज दि.१९ रोजी पॉझिटिव्ह आला आहेत. त्यामुळे परिसरात खबरदारी घेण्याच्या दृष्टीने आज रविवारी रात्री ११ वाजल्यापासून पिंपळेगुरव मधील काही भाग सील करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
पिंपळेगुरव मधील नरेंद्र सुपर मार्केट – महालक्ष्मी सुपर मार्केट – शेती परिसर – हरसिद्धी अपार्टमेंट – नदीच्या बाजूचा परिसर – मोरया पार्क रोड – आयनॉक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल – साठ फुटी रोड – नरेंद्र सुपर मार्केट हा परिसर सील करण्यात येणार आहे. रविवारी रात्री अकरा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत हा भाग सील राहणार आहे. या परिसरात प्रवेशबंदी तसेच परिसरातून बाहेर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान सील केलेल्या परिसरात प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचेही आदेशात म्हटले आहे.